महाराष्ट्र शासन | रायगड जिल्हा परिषद | पंचायत समिती मुरुड

आमची दूरदृष्टी आणि संभाव्य उपक्रम

आम्ही साळावच्या आजवरच्या प्रगतीचा अभिमान बाळगतो, पण आमची खरी नजर उद्याच्या साळाववर आहे! हा विभाग केवळ योजनांची यादी नाही, तर साळाव गावाला 'आदर्श ग्राम' बनवण्यासाठी ग्रामपंचायतीने पाहिलेले दीर्घकालीन स्वप्न आहे.  हे सर्व संभाव्य उपक्रम सामूहिक विचाराने आकार घेत आहेत. साळावच्या भविष्याचा नकाशा तयार करण्यासाठी आम्हाला तुमच्या कल्पना आणि सूचनांची गरज आहे. हा स्वप्नवत प्रवास यशस्वी करण्यासाठी, आपले मत आणि सहकार्य अत्यंत मोलाचे आहे.

सर्व शासकीय इमारती सौरऊर्जा

ग्रामपंचायत हद्दीतील पंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाड्या सौरुर्जचलीत बनविणे.

ISO मानांकन मिळविणे

नागरिकांना पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामपंचायत ISO प्रमाणित करणे.

प्रत्येक गावत CCTV यंत्रणा

गावांच्या सुरक्षिततेच्या हेतूने ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावातील मुख्य चौकामध्ये CCTV बसविणे.

गावांचे सुशोभीकरण

ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांच्या प्रवेश द्वाराजवळ सुशोभित स्वागत उद्याने (welcome park) बनविणे.

आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार

ग्रामपंचायत साळाव सर्व बाबतीत गुणसंपन्न करून आदर्श गाव (Smart Gram) पुरस्कार जिंकणे.

आदर्श आदिवाशीवाडी

संजय नगर आदिवाशी वाडीमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून आदर्श आदिवाशीवाडी बनविणे.

वरील सर्व संभाव्य उपक्रम सामूहिक विचाराने नक्कीच आकार घेतील. मात्र साळावच्या भविष्याचा नकाशा तयार करण्यासाठी आम्हाला तुमच्या कल्पना आणि सूचनांची गरज आहे. हा स्वप्नवत प्रवास यशस्वी करण्यासाठी, आपले मत आणि सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. म्हणूनच याबाबत आपल्या नाविन्यपूर्ण  सूचना नोंदवण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.