महाराष्ट्र शासन | रायगड जिल्हा परिषद | पंचायत समिती मुरुड

धार्मिक / पर्यटन स्थळे

बिर्ला मंदिर / विक्रम विनायक मंदिर

साळाव येथील बिर्ला मंदिर, ज्याला विक्रम विनायक मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित असलेले एक सुंदर संगमरवरी मंदिर आहे. हे अलिबाग-रोहा मार्गावर, साळावमध्ये डोंगरावर वसलेले आहे आणि ते बिर्ला कुटुंबाने बांधले आहे.

मंदिराची वैशिष्ट्ये

  • स्थळ:हे मंदिर अलिबागपासून सुमारे २० किमी अंतरावर साळाव येथे डोंगरावर वसलेले आहे.

  • बांधकाम:हे सुंदर मंदिर शुभ्र संगमरवरी दगडांनी बांधलेले आहे.

  • इतिहास:बिर्ला घराण्याने हे मंदिर बांधले असून, त्याचे उद्घाटन १९७२ मध्ये रामकृष्ण मिशनचे स्वामी रंगनाथानंद यांनी केले होते, अशी माहिती काही स्रोतांमध्ये आहे, तर काही ठिकाणी १९७२ मध्ये बिर्ला घराण्याने ते बांधले असे म्हटले आहे.

  • नाव:साळाव येथील या मंदिराचे नाव बिर्ला मंदिर असले तरी, ते विक्रम विनायक मंदिर या नावानेही ओळखले जाते, असे काही संदर्भ सांगतात.

भेट देण्यासाठी वेळ

  • सकाळी ६ ते ११

  • दुपारी ४.३० ते रात्री ९

आई सालाबादेवी मंदिर

साळाव येथील सालाबादेवी ही साळाव गावाची ग्रामदेवता असून या विभागातील एक जागृत देवस्थान आहे.

मंदिराची वैशिष्ट्ये

  • स्थळ: हे मंदिर अलिबागपासून सुमारे २० किमी अंतरावर साळाव येथे JSW STEEL या कारखान्याच्या मधोमध स्थित आहे. .

  • बांधकाम: हे सुंदर मंदिर पारंपारिक कोकणी पद्धतीचे बांधलेले आहे.

  • इतिहास: 70 वर्षापूर्वी आई सालाबादेवी पावसाच्या पुराच्या वेळेस भाताच्या मुठावर बसून शिला रुपामध्ये रोहातील पडम या गावातून पाण्यासोबत वाहत साळाव येथे आली. येथे एका भक्ताला स्वप्नात जाऊन आपण येथे आल्याचा दृष्टांत दिला. आणि त्यानंतर साळाव गावातील ग्रामस्थांनी या देवीच्या शिळेची स्थापना करून तेथे एक छोटेखाणी सुंदर असे मंदिर बांधले अशी माहिती जेष्ठ स्थानिक देतात.

  • नाव: साळाव या गावात वास्तव्य केल्याने या मातेचे नाव सालबादेवी असे प्रचलित आहे. 

भेट देण्यासाठी वेळ

  • सकाळी 8 ते सायंकाळी 6